Type Here to Get Search Results !

100+ Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes

Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes

माणूस म्हटला की कधी ना कधी त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येतो जेव्हा त्याला प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असं बऱ्याचदा घडतं की एखादी गोष्ट करण्याची धमक असूनसुद्धा आपल्याकडून होईल की नाही असा विचार करून माणूस झेप घ्यायला कचरतो. अगदी महाबली हनुमानालासुद्धा जांबुवंताने त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली होती त्यानंतर त्यांनी एका उड्डाणात शंभर योजन समुद्र पार केला होता. Motivational quotes in marathi प्रेरक विचार वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात आनंद येऊ लागतो आणि आपण आपल्या ध्येयाजवळ देखील पोहोचतो. प्रेरणादायक विचार वाचल्यानंतर आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सुरवात करतो. आपल्याला वाटते की आपण या जगात कोणतीही कामे करू शकतो. या विचाराने आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. Marathi Motivational Status | प्रेरणादायक सुविचार :-आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही प्रेरणादायक सुविचार. या विचारांची तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच मदत होईल.


Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes


माणसाने आरसा कधीच नसता पाहिला,
जर आरशामध्ये "चित्राच्या" ऐवजी माणसाचं "चारित्र" दिसलं असतं...!!


कायमस्वरूपी सोडलेल्या गोष्टी पुन्हा चालू केल्या तर त्रास होणारच ना..!

विचार तुमचे भलेही बदलत्या युगानुसार नवीन असू द्या,
पण संस्कार मात्र जुनेच जपले पाहिजेत...!!


आईची पूजा करणाऱ्या गर्दीने बघितलेच नाही की 
गर्दीमध्ये एक आई सुद्धा भुकेली आहे...!

त्याला माहित आहे की मुलं रागावतील, 
शिव्या देतील म्हणून तो वयोवृद्ध बाप 
आता खोकला आला तरी काही आवाज न करता शांत राहतो...!🥺😢

कामावरून दमून भागून आलेला बाबा जेव्हा आपल्या लेकराला बघतो, 
तेव्हा त्याचा ताण कुठल्या कुठे पळून जातो..!

लोक गरिबांशी असलेले त्यांचे जवळचे नाते लपवतात, 
आणि श्रीमंतांशी असलेले त्यांचे दूरचे नाते मोठ्या अविर्भावात सांगतात..!!

कधी कुणाचा हक्क अधिकार हिसकावून घेऊ नका
परमेश्वर वेळेबरोबर खूप काही हिसकावून घेतो...!
💯✅🍂🎯

वडील कोणतीही समस्या सहन करू शकतात, पण
कौटुंबिक समस्या त्यांना आतल्या आत आकार्यक्षम करत जाते.. 🥺

लंकेत गेल्यावर सीतेला एक नक्की माहीत होतं की, 
इथं आपण सोडून सगळे राक्षस. कुणापासून सावध राहायचं हे ती एकदाच, 
कायम स्वरूपात ठरवू शकली. पण आता अवस्था फार बिकट. इथं राक्षस कोण, 
हे ठरवण्यातच अर्ध आयुष्य जातंय. दर दिवशी नवे राक्षस, नवं युद्ध...

बदलत्या दुनियेचा असा असर होऊ लागला की,
लोकं "वेडी" आणि मोबाईल "स्मार्ट" होऊ लागला

हे आयुष्य फक्त तोपर्यंत हलके आहे जोपर्यंत सर्व ओझे 
आई वडिलांनी आपल्या खांद्यावर घेतलेले आहे..!

क्षणाक्षणाचा आहे हा प्रवास आनंदाने, हसतमुख जगा
नाहीतर आयुष्य तक्रारी करण्यातच निघून जाईल..

लहानपणी ज्या हाताने निःस्वार्थ भावनेने सांभाळलं 
आज ते थरथरत्या हातांना आधार द्या.
कारण आता थकणे हा त्यांचा अधिकार आहे आणि 
त्यांना आधार देणे आपली जबाबदारी...

Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes


देवसुद्धा रडू लागले, 
जेव्हा एका गरीबाच्या मुलाने देवासमोर हात जोडून विचारले,
देवा मला भूख का सारखी लागते..? 🥺😢

किती विचित्र लोकं आहेत नाही का, 
आनंद हिरावून घेतात आणि म्हणतात खुश रहा..

जर दुःखा मध्ये तुम्ही एकटे असाल तर 
सुखामध्ये देखील कुणाला येऊ देऊ नका..!

आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी, घरात मागे कुणीतरी असणं 
यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते...!!
- व पु.

चांगला विचार !!
प्रत्येकाची स्वतःची कथा आहे!
तो असा आहे, तो तसा आहे, कोणास ठाऊक, कोण कसा आहे! 
कोणाच्या आयुष्यात इतकेही डोकावू नका. 
दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापूर्वी, स्वतःला त्या जागी ठेऊन पहा.
ज्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे माहित नाहीत त्याबद्दल इतरांना सांगत बसू नका.
प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य आणि स्वतःची कहाणी असते! काहींच्या ओठांवर हास्य असते... 
तर काहींच्या डोळ्यात अश्रू असतात!

हरणे तेव्हा गरजेचे वाटते जेव्हा लढाई "आपल्या स्वतःच्या लोकांशी" असते, 
आणि जिंकणे तेव्हा आव्यश्यक होते जेव्हा लढाई "स्वतःशी" 

आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो की नाही हे नशिबाची गोष्ट आहे, 
पण त्यासाठी अजिबात प्रयत्न न करणे ही चुकीची गोष्ट आहे..

आम्ही रस्ता भटकंतच राहिलो,
कोणतेही ध्येय समोर दिसत नव्हते
आयुष्य आम्हाला अशा मार्गावर घेऊन गेले ,
जिथे आम्हाला जायचेच नव्हते.
काही वेळा नशिबाची साथ होती तर काही आपलीच चूक होती...
आम्ही सर्व गमावून बसलो त्या ठिकाणी 
ज्या ठिकाणी मिळवण्यासारखे काहीच नव्हते.!

Delete जेवढं फास्ट होतं 
तेवढं फास्ट Download होत नाही.
कारण वेळ तर निर्मिती करण्यात लागतो,
विरघळण्यासाठी काही सेकंदच पुरेशी असतात.
मग ते Application असो वा नातेसंबंध!!

जेव्हा जबाबदारी खांद्यावर पडते ना 
तेव्हा "मूड" पेक्षा काम अतिमहत्वाचं वाटतं..

सुख हा निव्वळ आभास आहे, 
पण तेच शोधण्यासाठी हा सगळा प्रवास आहे..

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर, 
जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार 
तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा
(कुसुमाग्रज)

Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes


अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याचीही आई होत असावी. 
पहिलं मूल होण्यापुर्वी ती केवळ प्रेयसी असते.
कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला 
तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते 
हे कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही.
- व पु काळे ( वपूर्वाई)

मृत्यू चा सुद्धा "कर्मा" शी खूप खोल संबंध आहे, साहेब 
प्रत्येकाच्या नशिबात सहज मृत्यू नसतो..!
काहींची तडफड असते, हेच कर्माचे गणित असते..!

संघर्षाच्या आगीत जो तापतो,
तो सोने म्हणून नावारूपाला येतो...
जो कठीण पारिस्थितीत सुद्धा न डगमगता स्थिर राहतो
तोच आपल्या ध्येया पर्यंत पोचतो 

दुसऱ्याला शिकवायचं ब्रह्म ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण
आज अशी परिस्थिती झालेय 
काही ठिकाणी, ज्या आई वडिलांनी तीन तीन मुलांचे संगोपन करून मोठं केलं 
पण आज त्या आईवडिलांना उतरत्या वयात वेगळं राहावं लागतंय, 
का नाही देव सुद्धा तुम्हाला मरण यातना देणार.. 

ज्याला "मी" पणाची हवा लागली 
त्याला ना कुठले "औषधं " कामाला आले ना "प्रार्थना..!

विचित्र गोष्ट आहे, माणसाला सगळं कायम हवं असतं, 
क्षणिक आयुष्यासाठी...!

मागची पिढी नाते निभाऊन गेली...
आताची पिढी नाती तोडण्यातच आनंद मानीत आहे.
येणारी पिढी नात्यांशिवाय राहणं पसंत करेल..!
कटू आहे पण सत्य आहे.

तुमची नियत कितीही साफ असुदे
शेवटी आरोप व्हायचे ते होतातच.."

परमेश्वराने हे आयुष्य दिलंय ते आनंदाने जगा,
एक दिवस असा येईल, की तुमच्याच कार्यक्रमात तुमची गैरहजेरी असेल.. 
जे स्वतःहून स्वतः च आयुष्य संपवू पाहत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं.

सगळीकडे शांतता पसरली वाटपाच्या वेळी,
जेव्हा आई म्हणाली, "मी कुणाच्या हिश्यामध्ये आहे"

बाबा,
एक असा व्यक्ती जो स्वतःचा आनंद गहाण ठेऊन 
आपल्या परिवाराच्या सुखासाठी झटत असतो.. 
भले आपल्या वाट्याला कमी येउदे पण माझा परिवार प्रत्येक गोष्टीत आनंदी राहूदे 
अशी अपेक्षा करणारा कर्ता..

काही चेहरे कधीच विसरता येत नाही
ते केवळ आठवणीमध्ये साठवले जातात.
काही काही क्षण पून्हा परतून येत नाहीत
फक्त आपल्या विचारामध्ये जगले जातात..
काही मनातल्या भावना ह्या अव्यक्त राहतात.
फक्त डोळ्यांनीच त्या बोलल्या जातात..
कधी कधी काही स्वप्ने अधुरी राहतात
फक्त हृदयामध्ये दडपून जातात.. 

वेळ आणि नातेसंबंध
काही व्यक्तींसोबत क्षण घालवताना आपण वेळ विसरतो 
आणि काही व्यक्ती अशा असतात की 
त्या वेळेसोबत आपल्यालासुद्धा विसरतात. हेच जीवन आहे..!

माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, 
दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलं आहे.
ही माणसं अशीच. यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप नको.
सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत नको. मुलं हवीत, 
पण संगोपनाची यातायात नको. गती हवी, पण प्रगती नको. 
प्रसिध्दी हवी, सिध्दी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. 
चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडामुंगीची हत्त्या होत नाही ना हे बघतो.
धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो.
-व.पु. काळे 
(माझं माझ्यापाशी)

आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात 
ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेल असतं...

जगातील सर्वात भाग्यवान माणुस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भुक आहे, 
अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि 
ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकत आहे ! तोच खरा माणुस..!

तुम्ही चांगले आहात हे साऱ्या जगभर दवंडी पिटा, 
आमचं काहीही म्हणणं नाही, पण दुसऱ्यांच वाईट सांगून तुम्ही चांगले आहात 
हे सांगायचे धंदे बंद करा.

मी स्वतःलाच विचारलं जीवन कसं जगावं ?
मला माझ्याच खोलीतून आवाज आला
छत म्हणालं - उच्च विचार कर
मनाच्या पंखा म्हणाला - डोकं शांत ठेव
घड्याळ म्हणालं - वेळेची किंमत कर ♡
कॅलेंडर म्हणालं - काळासोबत चल
पाकीट म्हणालं - पैशाची बचत कर ♡
आरसा म्हणाला - स्वतःकडे बघ
भिंत म्हणाली - दुसऱ्यांचं ओझं वाटून घे
खिडकी म्हणाली - बघण्याचा दृष्टिकोन बदल
फरशी म्हणाली - जमिनीशी जुळवून राहा 

आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की, शोधायचं काय आहे..?
शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की, 
मिळालं ते तरी कुठे.. सोबत नेता येणार आहे...! 

"नशिबात असतं तेच मिळतं, 
पण फक्त नशिबावर अवलंबून राहून अंधविश्वास ठेवणे 
हे आळशीपणाचे लक्षण आहे. 
"कष्ट करणारा व्यक्ती स्वतःचे नशीब लिहितो."

पसारा सहज मांडला जातो परंतू आवरतांना जीव कासावीस होतो..... 
मग तो घरातला असो नाहीतर मनातला.....!!

प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडतचं बसावं लागणार..... 
जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिकलं पाहिजे...!!

साद तिथेच द्यायची जिथे प्रतिसाद ऐकू येईल जेव्हा प्रतिसाद येणे बंद होईल 
तिथे वाद न घालता सरळ नात्याला विराम देऊन मोकळे व्हावं!

कधी कधी असंही होतं, काहीही बिघडलं नसताना सर्व ठाकठीक असताना 
मनात कोणतंतरी काहूर असतं. 
अशांती, अस्वस्थता, विमनस्कता, कसलं तरी काहूर आणि हुरहूर, 
काहीतरी गमावल्याची भावना किंवा काहीतरी गमावल्याची चुटपूट असं वाटत राहतं. 
संगीताचे सूर मनात झिरपत नाहीत. गप्पागोष्टीत मन हरवत नाही. 
आपल्याला जे काही हवंय, ते हे नव्हे, असं वाटत राहतं.
- व. पु.

वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. 
येण्याआगोदर एखादं पान देखील हलत नाही, 
अन आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही... 
मग ते निसर्गातलं असो वा मनातलं..

पदराच्या गाठीला रुपये बांधून ठेवते..!
एक छोटासा ATM आईसुद्धा ठेवते..!

आज सगळं आहे माझ्याकडे, 
पण बाप नावाचा आधार आणि आई नावाचा पदर नाही... 

सीता माई जिवंत मिळाल्या, ही प्रभू रामचंद्र यांची शक्ती होती
पण सीतामाई पवित्र मिळाल्या, ही रावणाची मर्यादा होती.

हसून पाहावं, रडून पहावं
जिवनाकडे डोळे भरून पहावं, आपण हजर नसतानाही कुणीतरी आपलं नाव काढावं.
माणसावर करावं की माणुसकीवर करावं
पण प्रेम मात्र मनापासून करावं..!

प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर होता..
पण वाईट याचंच वाटतंय की कुणी माझ्या जागेवर येऊन नाही पाहिलं 

आवड जितकी खोल असेल,
तितक्या वेदना देखील जास्त असतात.. 

जग तुम्हाला म्हणेल तू लायक नाहीयेस,
तुम्ही हसून म्हणा "वेळ सांगेल"

नाती गोती असावीत, पण नाती गोत्यात आणणारी नसावीत..

सण वाराच्या दिवशी मिळेन की नाही हे माहित नाही,
पण संकटकाळी सदैव उभा राहीन.. 
#मित्र

Deep Meaning Best Motivational Quotes in Marathi / Inspirational Quotes


महादेव, माझा परिवार सुखी राहूदे बस !!
माझं काय राहीन कसं पण 

पलटून उत्तर देणे निश्चितच चुकीची गोष्ट आहे, 
पण काय करणार, ऐकत राहिलात तर लोकं बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात.. 

आयुष्यात फ़ार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा "आशिर्वाद" घेऊन येतात 
बाकीचे सगळे तुमच्या साठी आणि तुम्ही शिकावे म्हणुन खुप सारे "धडे"च घेऊन येतात. 
परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणे गरजेचे असते, 
आशिर्वादामुळे जीवन सुखाचे होते. आणि जी मंडळी आपल्याला "धडा" शिकवतात 
ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही आदर करा.

वयानुरूप आपण किती गोष्टी आपोआप सोडल्या ह्याचा आढावा घेणंही फार मजेशीर होतं. 
गाभुळलेली चिंच अनेक वर्षांत खाल्ली नव्हती. 
जत्रेत मिळणारी फुग्याची शिट्टी तीस वर्षांत वाजवली नव्हती. 
चटक्यांच्या बिया घासून एकमेकांना चटके दिले नव्हते. 
परिस्थितीने दिलेलंच सहन करता-करता पुरेवाट होत होती. 
कॅलिडोस्कोपमधल्या बांगड्यांचे पॅटर्न्स पाह्यले नव्हते. 
कापसाच्या म्हातारीने उडता-उड़ता आपला 'बाळपणीचा काळ सुखाचा' 
स्वतः बरोबर कधी नेला, हे कळलंच नाही.
त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. 
त्याच्या बदली  तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
वपु काळे
मायाबाजार

वय म्हणजे एक पान, जीवनाच्या पुस्तकातलं, 
ज्यात प्रत्येक वळणावर नवीन कथा असते, तरीही काही आठवणींचा गोडवा कायम असतो.

शब्दांचा वापर तुम्ही कितीही समजुदारपणे केला 
तरी ऐकणारा त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याच्या मनातील विचारांनुसार त्यांचा अर्थ लावतो.

तुम्ही बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही. 
पण तुम्ही कधी चुकीचे होता किंवा तुम्ही कधी चूक केली हे मात्र कोणीच विसरत नाही... 
मला तेच लोकं वाईट समजतात ज्यांचा मी आजपर्यंत फक्त चांगलाच विचार करत आलोय..
वाईट कधी मनात आणलं सुद्धा नाही. 

वेळ म्हणते, मी पुन्हा येणार नाही... 
कोणी सांगावं मी तुझ्यासाठी सुख आणेन की दुःख.
जगायचे असेल तर जीवनाचा प्रत्येक अनमोल क्षण जगून घे... 
कारण हा क्षण मी पुढच्या क्षणापर्यंत नाही थांबवू शकणार!!

फुलासारखे हसत राहा.
भुंग्यासारखे गुणगुणत राहा... 
शांत राहिल्यावर नात्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण होतो.
कधी कधी त्यांचे थोडे ऐका...
कधी त्यांना स्वतःबद्दल काहीतरी सांगत राहा..हेच तर जिवन आहे 

असं म्हणतात की पाहिलं प्रेम विसरता येत नाही..
तरीसुद्धा माहित नाही लोकं आई वडिलांचं प्रेम का विसरतात? 

बाबा अमीर असुदे किंवा गरीब 
आपल्या मुलांसाठी "बादशहा " असतो..

तीन लोकं नेहमी त्रासलेले, चिंताग्रस दिसतील.
पाहिला प्रामाणिक, दुसरा नेहमी मदत करणारा आणि तिसरा साधा सरळ माणूस.

कर्म चांगले करा, 
परमेश्वरा जवळ फोन नाही जो तुमचे भक्ती वाले स्टेटस पाहिल. 

मृत व्यक्तीचं कोणी वाईट करत नाही,
मृत व्यक्तीचे विरोधक नसतात,
मृत व्यक्तीचे दुश्मन नसतात,
मृत व्यक्तीला पैशाची लालच नसतं 
या चार गोष्टी जर तुमच्या जीवनात नाहीत
तर तुम्ही जिवंत असून मृत आहात.. 

आयुष्य तुमचे स्वतःचे आहे, तर अपेक्षा सुद्धा स्वतःपासूनच ठेवा.

हसत आहात, खुश आहात तर चांगलच आहे..!
पण जाणून बुजून हसावं लागत आहे तर काही तरी समस्या आहे..!

फक्त मृत व्यक्ती नाही कधी कधी जिवंत माणसे सुद्धा पुन्हा परतून येत नाहीत.. 

नात्यामध्ये जोरजबरदस्ती करूच नये, 
ज्याला ज्या ठिकाणी चांगल वाटतं, 
शांतता मिळते त्याला तिथेच सोडून देणं योग्य ठरतं..!

थोरा मोठ्यांची छत्र छाया हे काही ओझे नाही, 
ते आपले संरक्षणात्मक कवच आहे.. त्याची काळजी घ्या, 
ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.

फक्त चांगले लिहिणे पुरेसे नाही, वाचणारा सुद्धा समजूतदार असायला हवा.. 
सखोल अर्थ समजून घेण्याइतका सक्षम देखील असला पाहिजे 💯

ज्यांना वडिलोपार्जित सर्व मिळालेलं असतं 
त्यांना "संघर्ष " काय असतो हे जरासुद्धा माहित नसतं.

मनातलं लिहलं तर शब्द रुसून जातात...
आणि खरं लिहलं की आपले रुसून जातात.!
"आयुष्य " समजणे खूप कठीण आहे मित्रा..
कोणी स्वप्नांसाठी आपल्या माणसांपासून दूर जातो 
तर कोणी आपल्या माणसांसाठी स्वप्नांपासून दूर जातो..!

काही नाती आजकाल त्या मार्गांवरून जात आहेत 
ज्या रस्त्यावर ना साथ सुद्धा सोडत नाहीत
की नाती निभावत देखील नाहीत
गप्प ही नाहीत आणि नीट से बोलू ही शकत नाही

प्रत्येक येणाऱ्या सकाळी "आयुष्य" एक नवीन कागद बहाल करतो
मग त्यावर काय लिहायचं हे आपल्याच हातात असतं नाही का?

पानांनी जेव्हा जेव्हा "रंग" बदलला,
नेहमी जमिनीवर पडली,
ही अशी निसर्ग उदाहरणं देत असतो, त्यातून हवे ते घ्यावे हेच माणूस विसरतो..!

आपल्या संस्कारामध्ये आपल्या आईवडिलांची सुद्धा ओळख होत असते.
प्रयत्न करा ती ओळख चांगलीच दिसेल..!

लक्षात ठेवा, 
ज्याने आपल्या जखमा स्वतः च भरल्या आहेत 
त्याच्यासारखा मजबूत कोणी नाही होऊ शकत..!

"अहंकार" हा असा एक पाहुणा आहे
जो येतो तर एकटा पण जाताना सर्व नाती सोबत घेऊन जातो..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.